पिंपरी : पावसाळा सुरू झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून डासोत्पत्ती स्थळ तयार होत आहेत. वाकड, मोशी आणि वाल्हेकरवाडीपरिसरात डेंग्यूचे पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मागील दहा दिवसांत पाच रुग्ण आढळून आले आहेत. शहरात डेंग्यूचेरूग्ण आढळत असून चार रूग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना उपचार करत घरी सोडले आहे. पण, एका रूग्णावर खासगी रूग्णालयातउपचार सुरू आहेत.
डेंग्यू, चिकुनगुनियासारखे आजार टाळण्यासाठी महापालिकेने पावसाळा सुरू होताच खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या आहेत. आस्थापनांनी तपासणी करून डासोत्पत्ती स्थळे नष्ट केली जात आहे. नागरिकांवरही कारवाई केली जात आहे. दरम्यान, जूनमहिनाअखेरीस शहरात तीन तर गेल्या दाेन दिवसात दाेन असे पाच रूग्ण आढळले आहेत.
वाकड, वाल्हेकरवाडी व मोशी अशा वेगवेगळ्या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. दरम्यान, शहरात एकूण ५ डेंग्यु रुग्ण आहेत. त्यापैकी ३ पुरुष व २ महिला रुग्ण आहेत. त्यापैकी ४ रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे. तर उर्वरितएक रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्या डेंग्यु आजाराचा रुग्ण निश्चित निदानासाठी सेंटीनल सेंटरचाच पॉझिटिव्ह अहवालआवश्यक आहे.
कोणत्याही रॅपीड किटचा अहवाल निश्चित निदानासाठी ग्राह्य धरण्यात येत नाही. पावसाळयात महापालिका क्षेत्रात डेंग्यु रोग पसरुनयेत म्हणून वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. यासाठी डासोत्पत्ती स्थानांवरील नियंत्रणाची उपरोक्त माहिती नागरिकापर्यंत पोहोचवूनजनजागृती करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली आहे.
एडिस डासांची पैदास रोखण्यासाठी हे करा
– सर्व पाण्याच्या टाक्या आणि कंटेनर झाकणाने झाकून ठेवा
– डेंग्यूच्या डासांची पैदास रोखण्यासाठी दर आठवड्याला कूलर
– फ्रीज खालील ट्रेमधील पाणी रिकामे करावे
– डासांचा प्रवेश रोखण्यासाठी दारे आणि खिडक्यांवर वायरची जाळी लावा
– सर्व न वापरलेले कंटेनर, रद्दीचे साहित्य, टायर, नारळाची टरफले योग्य विल्हेवाट लावावी
– फुलदाण्यातील, कुंड्यांतील पाणी दर आठवड्याला बदलावे
– डास चावण्यापासून वाचण्यासाठी पूर्ण बाह्यांचे कपडे घाला
– एडिस डास चावण्यापासून बचाव करण्यासाठी मॉस्किटो रिपेलेंट्स वापरा
डेंग्यू रुग्णामध्ये ही दिसतात लक्षणे
– तीव्र ताप
– तीव्र डोकेदुखी
– स्नायुदुखी व सांधेदुखी
– उलट्या होणे
– डोळयांच्या आतील बाजुस दुखणे
– अंगावर पुरळ
– अशक्तपणा
– भुक मंदावणे
– तोंडाला कोरड पडणे
– नाकातून रक्तस्त्राव व रक्ताची उलटी होणे
– रक्तमिश्रीत, काळसर रंगाची शौचास होणे
– पोट दुखणे
– रक्तदाब कमी होणे
– हातपाय थंड पडणे