उद्या दुपारी दोन वाजता तुकोबारायांच्या पालखीचे प्रस्थान

0

देहू : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत पंढरपूरच्या आषाढी वारीला जाण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक श्री क्षेत्रदेहूमध्ये दाखल होऊ लागले आहेत. उद्या म्हणजे शनिवारी (दि. १० जून) दुपारी दोनच्या सुमारास पालखी मंदिरातून प्रस्थान ठेवणारआहे. त्यासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे.

उद्या पालखीचा देहूतच मुक्काम असेल. तर, परवा म्हणजेच रविवार (दि. ११) रोजी पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. प्रस्थानसोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. वाहतूक कोंडी होऊ नये आणि कोणताही अनुचितप्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. यंदा सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्याभाविकांची संख्या आणि नेहमी होणाऱ्या गर्दी पेक्षा जास्त होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच दिंड्यांची संख्याही वाढवण्यातआली आहे. मुख्य वैकुंठ स्थान मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

शनिवारी पालखी प्रस्थान सोहळ्यात होणारे धार्मिक कार्यक्रम पुढीलप्रमाणे

पहाटे वाजताश्रीची संत तुकाराम शिळा मंदीर, श्री विठ्ठलरखुमाई महापूजा

पहाटे .३० वाजतातपोनिधी नारायण महाराज समाधी महापूजा

सकाळी ते ११ वाजताश्री संत तुकाराम महाराज पादुका पूजन, इनामदार वाडा.

सकाळी १० ते १२ वाजतापालखी प्रस्थान सोहळा काला कीर्तन

दुपारी वाजतापालखी प्रस्थान सोहळा

सायंकाळी वाजतापालखी प्रदक्षिणा

सायंकाळी .३० वाजतापालखी सोहळा मुक्काम, इनामदार वाडा, मुख्य आरती.

रात्री वाजता कीर्तन, जागर

दरम्यान, पूर्वी संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा चिखलीमार्गे आळंदीपुणे असा जात होता. परतीचा प्रवासही पुणेआळंदी, चिखली मार्गे देहू असा होता. मात्र काही वर्षांपासून चिखली मार्गे होणारा हा परतीचा प्रवास बंद झाला आहे. पालखीचा परतीचाप्रवासही पूर्वीप्रमाणे टाळगाव चिखली मार्गे सुरू करावा, अशी मागणी श्री क्षेत्र टाळगाव चिखली प्रसादिक दिंडीचे अध्यक्ष काळूराम मोरेआणि सचिव आनंदा यादव यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.