‘आयकर विभागाच्या कारवाईशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काहीही संबंध नाही’

0

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आयकर विभागाच्या कारवाईचे वृत्त निराधार असल्याचे पवार यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत ॲड. पाटील म्हणाले,  अजित पवार यांच्याशी संबधित कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणलेली नाही किंवा त्यासंदर्भातील कोणतीही नोटीस अजित पवार यांना प्राप्त झालेली नाही. यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमात येत असलेले वृत्त निराधार, वस्तुस्थितीशी विसंगत, खोडसाळपणाचे असल्याचे सांगितले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रसारीत होत असलेल्या बातम्यांचे खंडन करताना त्यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील म्हणाले, अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच आलेली नाही किंवा त्यासंदर्भात नोटीसही बजावण्यात आलेली नाही.

केवळ आयकर विभागाकडून काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. त्या पत्राला योग्य ते उत्तर देण्यात येईल. प्रशासकीय आणि कायदेशीर मार्गाने योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे अजित पवार यांच्या वकिलांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, प्रसिद्धीमाध्यमांनी वस्तुस्थिती तपासून बातम्या द्याव्यात व कुठलाही अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे यावेळी करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.