उपमहापौर केशव घोळवे यांचा तडकाफडकी राजीनामा

0
पिंपरी : पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांनी तीन महिन्याच्या आत राजीनामा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. घोळवे यांनी महापौर उषा ढोरे यांच्याकडे आज ( शुक्रवारी ) उपमहापौर पदाचा राजीनामा दिला असून महापौरांनी तो मंजूर करत आयुक्तांकडे पाठविला आहे .

भाजपने 14 ऑक्टोबर 2020 रोजी तुषार हिंगे यांचा तडकाफडकी उपमहापौरपदाचा राजीनामा घेतला होता . त्यांच्या जागी हिंगे यांच्या प्रभागातील केशव घोळवे यांची 6 नोव्हेंबर 2020 रोजी उपमहापौरपदी संधी दिली . यावेळी मोशी येथील वसंत बोराटे तीव्र इच्छुक होते . त्यामुळे हिंगे पाठोपाठ घोळवे यांचा तडकाफडकी राजीनामा कुणासाठी घेतला हे काही दिवसात कळेल .

Leave A Reply

Your email address will not be published.