लसीचे दोन डोस घेऊनही ‘एम्स’चे 35 डॉक्टर कोरोना बाधित

0

नवी दिल्ली : कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून लसीकरणाचे दोन डोस घेऊनही दिल्लीतील एम्स रुग्णालयातील तब्बल 35 डॉक्टर्स कोरोनाबाधित झाले आहेत. तर गंगाराम रुग्णालयातील 37 डॉक्टर्सना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गंगाराम रुग्णालयानंतर आता एम्स रुग्णालयातही कोरोनाने शिरकाव केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णालयातील तब्बल 35 डॉक्टरांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे.

यामध्ये ज्युनिअर, सिनिअर, स्पेशालिस्ट यांच्यासह इतर डॉक्टरांचा समावेश आहे. या सर्वांमध्ये गंभीर लक्षणे नसून, सौम्य लक्षणे आहेत. यातील काही डॉक्टरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, कोरोनाबाधित आढळलेल्या सर्वाधिक डॉक्टरांनी कोरोनाचा पहिला आणि दुसरा डोस घेतला होता. या डॉक्टरांसह 50 पेक्षा जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये 15 जण हाडासंबंधित विभागातील कर्मचारी आहेत. असे असले तरीही याबाबतची अधिकृत माहिती दिली गेली नाही.

neww
Leave A Reply

Your email address will not be published.