पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुंडा विरोधी पथक आणि सायबर सेल हे सोशल मीडियावरील गुन्हेगारीवर वॉच ठेवून आहे. इन्स्ट्राग्राम वर हत्यारासह व्हिडीओ टाकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना गुंडा विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे.
सोशल मीडियावर दोन तरुणांनी हातात रेम्बो चाकु आणि कोयता घेऊन व्हिडीओ टाकला. यामुळे समाजात भीतीचे वातावरण तयार झाले. यामुळे गुन्हेगारी टोळीमध्ये वादंग वाढण्याची शक्यता नाकरात येत नव्हती.
या व्हिडीओची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानंतर तांत्रिक तपास करुन ही मुले देहूरोड परिसरात असल्याचे समजले. त्यानंतर गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख हरीश माने आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून हत्यारे जप्त केली आहेत.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे हरीश माने, अंमलदार नूरहजरात पठाण, प्रवीण तापकीर, मेडगे, तेलेवार, कदम, मोहिते या पथकाने कारवाई केली आहे.