राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचेवर दुसऱ्या पत्नीचे मेव्हणीने बलात्काराचा आराेप करत त्याबाबत मुंबईतील ओशिवारा पाेलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर फेसबुकवर मुंडे यांनी भावनिक पाेस्ट करत दुसऱ्या पत्नी साेबतचे संबंध जगजाहीर करत तिच्या दाेन मुलांचा स्विकार करत असल्याची कबुली दिली. मात्र, निवडणुक लढताना त्यांनी निवडणुक आयाेगास सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दुसरी पत्नी अथवा तिच्यापासूनची मुले यांचा उल्लेख न करता ती माहिती लपवून ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हिंदु विवाह प्रतिबंधक कायद्या 1946 नुसार दाेन लग्न करणे गुन्हा असून मुलांची माहिती लपवून ठेवणे गुन्हा हाेऊ शकताे आणि आमदारकी रद्द हाेण्याचा धाेका संभावताे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते ऍडड.असीम सराेदे यांनी दिली आहे.
अॅड. सराेदे म्हणाले, विवाह प्रतिबंधक कायदानुसार एखाद्या महिले साेबत धार्मिक रितीरिवाजानुसार अथवा रजिस्टर लग्न झाल्यानंतर दुसरे लग्न करणे बेकायदेशीर ठरते. 2006 पासून मुंडे यांनी त्यांचे दुसऱ्या पत्नीशी संबंध असल्याचे कबुल केले असून दाेघे एकत्रित मुंबईत राहिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु याबाबतची माहिती त्यांचे पहिल्या पत्नीस असून तिने अद्याप त्यांच्या विराेधात काेणती तक्रार केलेली नाही. तसेच दुसऱ्या पत्नीशी विवाह न करता ते एकत्रित राहिले असल्याने तसेच त्यांनी ही त्यांच्या विराेधात अद्याप तक्रार केलेली नसल्याने मुंडे याप्रकरणात बचावले आहे. मात्र, दुसऱ्या पत्नीपासून झालेली दाेन मुलांची माहिती त्यांनी निवडणुक आयाेगाचे प्रतिज्ञापत्रात लपवून ठेवली ही बाब प्रतिज्ञापत्र खाेटे सादर केल्याचा पुरावा हाेऊ शकते. त्यात केवळ तीनच अपत्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे भारतीय प्रतिज्ञापत्र कायदा आणि भारतीय शपथ कायदा यानुसार ही माहिती दिशाभूल करणारी असल्याने गुन्हा हाेऊ शकते.
निवडणुक आयाेगाने अशाप्रकरणात काेणी तक्रार आल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा स्वत:हून पुढाकार घेत कारवाईची हालचाल करणे महत्वपूर्ण आहे. भारतीय राजकारणात अशाप्रकारे अनेकवेळा खाेटी प्रतिज्ञापत्र निवडणुक आयाेगास सादर केली जातात आणि ती शाहनिशा करण्याची काेणती पध्दत नसल्याने चुकीचा पायंडा पडत चालला आहे. मुंडे यांचे दुसऱ्या पत्नीचे मेव्हणीची लैंगिक छळाची तक्रार पाेलीसांनी दाखल करुन घेत त्याची शाहनिशा करुन दखलपात्र गुन्हा दाखल करत याेग्यप्रकारे तपास केला पाहिजे.