धर्मेंद्र, सनी आणि बाॅबी पुन्हा एकत्र दिसणार

'अपने-२' चित्रपटाचे शुटींग मार्च महिन्यात होणार सुरू 

0

मुंबई ः ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, मोठा भाऊ सनी देओल यांच्यासोबत सुपरहीट चित्रपट ‘अपने’ चित्रपटाचा सिक्वेल बनविण्याचा खुलासा अभिनेते बाॅबी देओल यांनी ‘अमर उजाला’ला दिलेल्या मुलाखतीत केला. हा चित्रपट स्पोर्ट्स ड्रामा प्रकारातील असणार आहे आणि त्याचे चित्रीकरण पुढच्या वर्षातील मार्च महिन्यात सुरु करण्यात येणार आहे.

प्रसिद्ध निर्माता दीपक मुकूट या चित्रपटासाठी पैसे खर्च करणार आहेत. ‘अपने’ चित्रपटातून धर्मेंद्र आणि त्यांच्या दोन मुलांनी आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर केली होती. १४ वर्षांनतर हे तिघे जण या चित्रपटाच्या कथेला पुढे सरकविणार आहेत. अनिल शर्मा आणि दीपक मुकूट तिघांना एकत्र आणण्यात यशस्वी झालेले आहेत.

सूत्रांच्या सांगण्यानुसार हा चित्रपट एक्शन, इमोशन, ड्रामा आणि भरपूर मनोरंजन आहे. यामध्ये काही नवीन कलाकार घेण्यात आलेले आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण युरोप आणि पंजाबमध्ये होणार आहे. पुढील वर्षातील दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज करण्याचा विचार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.