”करोनाने सांगितलंय का? बैठक घेतली तर याद राखा”

0

मुंबई ः हिवाळी अधिवेशनामध्ये विरोध पक्षाकडून महाविकास आघाडीच्या सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ”लोकल सुरू केल्यावर करोनाचा त्रास होत नाही. पण, आम्ही बैठक घेतली तर करोनाचा त्रास होतो. असं करोनानं तुमच्या कानात येईन सांगितलंय का?”, असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला विचारला आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. करोना आणि इतर बाबींवरून ठाकरे सरकारला सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्न विचारले आहेत. मुनगंटीवार यांनी सभागृहातील एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

”बैठका सुरू झाल्यात अशा आदेश द्या, अशी मागणी विधानसबा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मुनगंटीवार यांनी केली आहे. नोटिफिकेशन द्यायलाही तयार नाही. सर्व समित्या कोम्यामध्ये आहेत. लोकल सुरू करता येते तिथे करोनाचा त्रास होत नाही. पण, उद्या आम्ही बैठक घेतली तर करोना व्हायरसने तुम्ही बैठक घेतली तर याद राखा,असं सांगितलं आहे”, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.