युतीसाठी उद्धव ठाकरे- PM मोदींमध्ये 2021 मध्येच बैठक झाली होती का? फडणवीस म्हणाले…

0

मुंबई : शिवसेनेच्या 12 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंडखोरी करत लोकसभेत आपला वेगळा गट स्थापन करत लोकसभा अध्यक्षांना तसे पत्र दिले आहे. दरम्यान, शिंदे आणि बंडखोर खासदारांनी दिल्ली एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये खासदार राहुल शेवाळे यांनी भाजपा-शिवसेनेच्या युतीबाबत 2021 मध्येच उद्धव ठाकरे व नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाली होती. मात्र, जुलैमध्ये भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन झाल्यानंतर हा विषय फिस्ककटला, असा दावा शेवाळेंनी केला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारले असता त्यांनी बोलणे टाळले आहे.

फडणवीस म्हणाले, मी आत्ता विभागीय आयुक्त कार्यालयात असून ही पूरपरिस्थितीची पत्रकार परिषद आहे. वीजेबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, सध्या जाणीवपूर्वक काही भागात वीज बंद करण्यात आली आहे. कारण अशावेळी अपघात होऊ शकतात. मात्र काही भागांमधील वीज लवकरात लवकर सुरळीत व्हावी यासाठीही आदेश दिले आहेत.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, हिंगणघाटसारख्या शहरांमध्ये मोठ्या भागातील वीज बंद होती. ती टप्प्या-टप्प्याने सुरळीत होत आहे. ग्रामीण भागातही तीच स्थिती आहे. जेथे ट्रान्सफॉर्मर पाण्याखाली गेले आहेत तेथे वीज बंद केली आहे. मात्र, लवकरच ती सुरू होईल.

फडणवीस म्हणाले, पुरामुळे पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी लहान पूल कोसळले आहेत.
अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे बसेसला फेरा मारून जावे लागेल.
तातडीने करायची कामे व दीर्घकालीन कामे यांचा अहवाल मागितले आहेत. कामांचा आढावा घेतला जात आहे. मागील आकडेवारी पाहिली तर सप्टेंबर महिन्यात देखील काही प्रमाणात अतिवृष्टी होती.

एसडीआरएफ, एनडीआरएफची पथके वेळीच पोहचल्याने अनेक लोकांचे जीव वाचवता आले आहेत. धरणांवरही बारकाईने लक्ष आहे. ढगफुटीसारखी एखादी घटना घडली किंवा जास्त पाऊस पडला नियंत्रण राहत नाही. अशावेळी मदतीचा वेळ कमीत कमी कसा असेल यावर भर दिला जात आहे.

फडणवीस म्हणाले, सर्व पाणी वाहून गडचिरोलीकडे जात असल्याने तिथे चिंतेची स्थिती होऊ शकते. गडचिरोलीतून पाणी तेलंगणाला जात असल्याने तिकडेही पूरस्थिती तयार झाली तर अडचणी येतील. सिरोंचाला याचा अधिक फटका बसला आहे. तिथे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. आम्ही जिल्हाधिकार्‍यांना पुढील चार-पाच वर्षांचा दीर्घकालीन आराखडा तयार करून गावांचा कायमस्वरुपी संपर्क ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.