मुंबई : भारतीय कार जगतात प्रसिद्ध असणारे डीसी डिझाइन या कार मॉडिफिकेशन स्टुडिओचे ते संस्थापक दिलीप छाब्रीया यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तसेच कारही जप्त केली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड एमआयडीसी परिसरात दिलीप छाब्रीया यांचे वर्कशॉप आहे. त्यांना एका फसवणुकीच्या प्रकरणात अटक करण्यात आली असल्याचे सह पोलीस आयुक्त (क्राइम) मिलिंद भारंबे यांनी सांगितले आहे. छाब्रीया यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब) आणि ३४ अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्राहकांच्या पसंतीला उतरतील आकर्षक आणि आलीशान कार या स्टुडिओत घडवल्या जातात. अनेक सेलिब्रिटींकडे छाब्रीया यांनी डिझाइन केलेल्या कार आहेत.