दिग्दर्शक अनुराग आणि तापसीची चौकशी पिंपरी चिंचवड शहरात सुरु

0

पिंपरी : दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू मागे आयकरचा ससेमिरा सुरूच आहे. अनुराग, तापसीची चौकशी पिंपरी चिंचवडमधील हॉटेलमध्ये सुरु आहे. फँटम फिल्मला अधिकचा नफा झालेला असताना कमी दाखवून कर चोरी केल्याच्या आरोपाखाली सध्या आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे.

दिग्दर्शक अनुराग आणि तापसी पिंपरी चिंचवड मधील एका नामांकित हॉटेलमध्ये उतरले आहेत. या ठिकाणी आयकर विभागाकडून चौकशी केली जात असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू, फँटम फिल्मचा सहसंस्थापक विकास बहल, गुणवत्ता व्यवस्थापन कंपनी क्वानचा मधू मंटेना यांच्या मालमत्तांवर आयकरच्या पथकांनी ३ मार्च रोजी छापे टाकले. त्याच दिवशी मध्यरात्रीपर्यंत अनुराग आणि तापसी पुण्यात चौकशी करण्यात आली होती.

प्राप्तिकर विभागाने दोन चित्रपट कंपन्या, दोन गुणवत्ता व्यवस्थापन कंपन्या आणि आघाडीच्या अभिनेत्रीच्या निवासस्थानावर छापे टाकून ६५० कोटी रुपयांची आर्थिक अनियमितता उघडकीस आणली असल्याचा दावा गुरुवारी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने केला होता. मात्र मंडळाकडून कोणाचेही नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.