पिंपरी : पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी आज सकाळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात येऊन मिटिंग सुरू केली आहे. आयुक्तालयातील वाढती गुन्हेगारी आणि पोलिसांच्या समस्या यावर हि मिटिंग असल्याचे बोलले जात आहे.
शुक्रवारी सकाळी साडे आकाराच्या सुमारास पोलीस महासंचालक आयुक्तालयात आले आहेत. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त परदेशी, पोलीस उपायुक्त विवेक पाटील, काकासाहेब डोळे, स्वप्ना गोरेयांच्यसह अधिकारी उपस्थित आहेत.
तळेगाव दाभाडे येथील किशोर आवारे हत्या प्रकरण आणि आयुक्तालयातील वाढती गुन्हेगारी या संदर्भात मिटिंग असल्याचे शक्यता आहे. याचबरोबर पोलीस आयुक्तालयातील समस्या यावरही चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.