पुणे : जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मानवतेला काळीमा फासणारी ही घटना उघडकीस आली. घरात एकटीच असणाऱ्या नऊ वर्षाच्या मुलीवर बापाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावात शनिवारी ही घटना घडली. ओतूर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की घटनेच्या दिवशी पीडित मुलगी घरामध्ये एकटीच होती. त्यानंतर दुपारच्या सुमारास आरोपी बापाने तिच्यासोबत हे अनैसर्गिक कृत्य केले. मुलीच्या आईला या घटनेची माहिती कळाल्यानंतर तिने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली.
कोथरुड पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत नराधम बापाला विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्याला तत्काळ अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास एपीआय कांबळे करीत आहेत.