पिपंरी : ‘तू नवर्याबरोबर शारिरीक संबंध ठेवते, तसे माझ्याबरोबर शारिरीक संबंध ठेव’, असे म्हणून सासर्याने सूनेला जवळ ओढून अश्लिल कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी आळंदी पोलिसांनी सासर्यासह सूनेचा पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार खेड तालुक्यातील कोयाळी गावात जून 2019 पासून 21 जुलै 2021 पर्यंत सुरु होता.
याप्रकरणी सुनेने आळंदी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांचे लग्न झाल्यानंतर तिचा पती माहेरून सोन्याच्या साखळीसाठी 1 लाख 10 हजार रुपये घेऊन येण्यास सांगत असतो. तसेच घरातील व शेतातील कामे नीट येत नाहीत, या कारणावरुन वेळोवेळी फिर्यादीला शिवीगाळ करुन मारहाण करीत. फिर्यादी व सासू यांचे भांडण झाल्यावर फिर्यादी या तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे जाते असे म्हणल्यावर सासू व सासर्यांनी तिला घरात कोंडून ठेवले होते.
फिर्यादी व सासरे हे बुधवारी शेतामध्ये काम करण्यासाठी गेले होते. त्यावेळी सासर्याने फिर्यादी यांच्याजवळ येऊन तू तुझे नवर्याबरोबर शारिरीक संबंध ठेवते तसे माझ्याबरोबर शारिरीक संबंध ठेव असे म्हणून त्यांना आपल्याजवळ ओढले. त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. या प्रकारानंतर सुनेने पोलिसांकडे फिर्याद दिली असून आळंदी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.