माणुसकीला काळीमा ! महिलेला मुत्र पाजण्याचा प्रयत्न; 4 महिलांसह 8 जणांवर गुन्हा

0

पिंपरी :  हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत किळसवाणा प्रकार घडला आहे. शिवीगाळ गेल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला बेदम मारहाण करुन जबरदस्तीने लघवी पाजण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात चार महिलांसह 8 जणांवर IPC 354, 324, 342, 143, 147, 148, 148, 323, 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार महिलांसह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 15 मे रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मुळशी तालुक्यातील सुसगाव येथे घडला आहे. संबंधित महिलेने शनिवारी (दि. 21) हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

महिलेच्या तक्रारीनुसार शेजारी राहणाऱ्या भावकीतील व्यक्तीकडून शिवीगाळ झाल्यानंतर संबंधित महिला सासऱ्या सोबत जाब विचरण्यासाठी गेली होती. आम्हाला शिवीगाळ का केली असा जाब तिने विचारला. त्यावेळी आरोपींनी महिला आणि तिच्या सासऱ्यांना लाथाबुक्क्या, चपला आणि काठीने बेदम मारहाण केली. एवढंच नाही तर आरोपींनी बाटलीत लघवी गोळा करुन आपल्याला पाजण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी महिलेला आणि सासऱ्यांना खोलीत डांबून ठेवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

हा प्रकार 15 मे रोजी सूसगाव या ठिकाणी घडला होता. घडलेल्या प्रकारामुळे महिला आणि तिचे सासरे तणावात होते. या धक्क्यातून सावरत महिलेने 21 मे रोजी पोलिसांत धाव घेतली आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनंतर हिंजवडी पोलीस ठाण्यात चार महिलांसाठी आठ जणांवर विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश खारगे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.