निगडी येथे जिल्हा क्रीडा संमेलन संपन्न

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड क्रीडाभारती आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा संमेलन 2022 निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाच्या प्रांगणातसंपन्न झाले. या संमेलनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील अनेक नामवंत खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडासंघटक, क्रीडा साहित्य निर्माते, विक्रेते, व्यापारी, स्पोर्ट्स क्लब, खेळ संघटना, व्यायामशाळा, ज्येष्ठ नागरिक संघटना, क्रीडा वैद्य, मनसोपचार तज्ज्ञ, आणि अनेक क्रीडाप्रेमीयांना आमंत्रित करण्यात आले होते. या संमेलनाद्वारे प्रत्येक नागरिकांने कोणता ना कोणता खेळ खेळावा यासाठी प्रवृत करणाऱ्यासमाजातील सर्वांना आमंत्रित केले होते. विटी दांडू, लगोरी, गोट्या पासून हॉलिबॉल, आर्चरी, कबड्डी, डॉजबॉल पर्यंत खेळ खेळण्यासाठीमैदाने तयार केली होती.त्या द्वारे स्पर्धाही घेण्यात आल्या.सुमारे तीनशे क्रीडाप्रेमिंनी त्यात सहभाग घेऊन खेळाचा आनंद लुटला.

       

या वेळी अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, ऑलम्पिक वीर बाळकृष्ण अकोटकर,डॉ.महेश देशपांडे, विजय पुरंदरे,ज्ञान प्रबोधिनीनिगडी चे प्राचार्य मनोज देवळेकर, महाराष्ट्र शा. शि. शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर, डॉ. सतीश बोरकर आदी क्रीडाक्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवर पाहूणे म्हणून उपस्थित होते.

जिल्हातील अनेक छत्रपती अवार्ड विजेते, अर्जुन पुरस्कार विजेते, राष्ट्रीय खेळाडू, क्रीडाक्षेत्रातील उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तीयांचा क्रीडाभारतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 

या वेळी क्रीडा तज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. महेश देशपांडे यांनी जीवनातील खेळाचे अनन्यसाधारण महत्व आपल्या भाषणातून पटवूनदिले. “फिटनेस चा डोस, अर्धा तास रोजही संकल्पना विजय पुरंदरे यांनी मांडताना आधुनिक काळात व्यायाम आणि खेळ त्यांचेमहत्व सांगितले. प्राचार्य मनोज देवळेकर आपल्या भाषणात म्हणालेभौतिक सुखाच्या मागे लागता लागता कोरोना कधी आला आणिलाखो लोकांनी जीव गमावला हे कळलेच नाही. आता तरी आपण आपले आरोग्य जपावे, शरीराची काळजी घ्यावी हा विचार समाजातरुजतोय आणि त्या साठी लोक हळू हळू खेळाकडे वळताहेत समाधानाची ही बाब आहे“. भारतीय योगा टीमचे कोच चंद्रकांत पांगारेयांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थांनी योगा प्रात्यक्षिकाद्वारेवंदे मातरमगीताचे अप्रतिम सादरीकरण केले.

   

क्रीडाभारतीचे गीत मुग्धा देशपांडे यांनी गायिले तर प्रतिज्ञा गंगाधर सोनवणे यांनी घेतली. पश्चिम महाराष्ट्र मंत्री चंद्रशेखर कुलकर्णी, राजेंद्र महाजन, दिनेश कुलकर्णी, रमेश बंदपट्टे,हरिष अनगोळकर , चैत्राली कुलकर्णी, प्रीती काळे,सचिन बचूटे, जगदीश सोनवणे, उल्हास मापूस्कर, सचिन नाडे, सचिन ववले, हेमंत मखरे, विकास तलेगिरी, राजश्री धुरी, माधवी इनामदार, भक्ती थोरात आदीक्रीडाभारती सदस्यांनी उत्कृष्ट नियोजन केले. सूत्रसंचालन मिनल गोडसे, साहेबराव जाधव यांनी केले. पिंपरी चिंचवड क्रीडाभारती चेउपाध्यक्ष भगवान सोनवणे यांनी आभार व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.