पुणे जिल्ह्याचे विभाजन करुन पिंपरी-चिंचवड ‘शिवनेरी’ नवा जिल्हा करा : महेश लांडगे

0

पिंपरी : स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाला मान्यता मिळाली. पिंपरीचिंचवड पोलीस आयुक्तालयनिर्माण झाले. त्याच धर्तीवर पिंपरीचिंचवड शहर विस्तारत आहे. तसेच पुणे जिल्ह्याचाही विस्तारवाढत आहे. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन करावे. सर्व प्रशासकीय कामांसाठी पुण्याकडे जावे लागते. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन करावे आणिशिवनेरीहा नवा जिल्हा करावा पिंपरीचिंचवडला स्वतंत्र्यतालुका म्हणून निर्मिती करावी, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी केली.

पिंपरीचिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांचे भूमीपूजन आणि उद्धघाटने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणिपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या कार्यक्रमात बोलताना आमदार लांडगे यांनी पुणे जिल्हा विभाजनाचीमागणी केली.

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शहराला पोलीस आयुक्तालय मिळाले. पिंपरीचिंचवड शहराबरोबर जिल्हा मोठा होत आहे. त्यामुळेजिल्ह्याचे विभाजन करता आले तर करावे. पिंपरीचिंचवडचा बाजूचा भाग घेवून नवीन जिल्ह्याची निर्मिती करावी. त्याला शिवनेरी असेनाव द्यावे. त्यामुळे प्रशासकीय काम सोपी होतील. राजकीय विभाजन नव्हे केवळ जिल्हा करावा अशी मागणी असल्याचे पत्रकारांनासांगत कोटीही त्यांनी केली.

शास्तीकराचे ओझे सर्वाधिक माझ्यावर होते. कारण, लोक वारंवार विचारत होते. शास्तीकर माफीच्या घोषणेचे काय झाले? पण, देवेंद्रफडणवीस यांनी शास्तीकर पूर्ण माफ केला. त्याचा आनंद सर्वाधिक झाला. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ 200 खाटांचे कॅन्सर हॉस्पिटल, मोशीत 850 खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात येत आहे. शहराचा सर्वांगीण विकास होत असतानाशहरातील खेळाडू ऑलिम्पिकमध्ये चमकावा. याकरिता कबड्डी आणि कुस्तीसारख्या पारंपरिक खेळांनाही प्रोत्साह द्यावे.

Leave A Reply

Your email address will not be published.