दिव्या भटनागरचा मृत्यू करोनाने की, पतीच्या छळवणुकीने?
दिव्याचा भाऊ दिव्याशिशने स्क्रिनशाॅट केले शेअर
मुंबई ः ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या हिंदी मालिकेतील अभिनेत्री दिव्या भटनागर हिचं ७ डिसेंबला करोनाने निधन झालं होतं. त्यानंतर टिव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरलेली होती.
मात्र, दिव्याच्या भावाने म्हणजेच दिव्याशिश भटनागरने दिव्याशी केलेल्या चॅटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत दिव्याच्या पतीवर छळवणुकीचा आरोप केला आहे.
दिव्याने आपल्या मैत्रिणीबरोबर घरातून मानसिक आणि शारीरिक त्रास होत असल्याचे चॅटमधून सांगितले होते. चॅटचे स्क्रिनशाॅट इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले.
दिव्याचा पती गगन गब्रू याने लग्नानंतर दिव्याला सतत मारहाण करत होता. तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता. गगन आणि त्याची आई यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
भावानं लिहिलं आहे की, हे सर्व मला आधी कळलं असतं तर या राक्षसापासून दिव्याला वाचवलं असतं. तुमच्यावर अत्याचारल होत असेल तर गप्प बसू नका मित्रांबरोबर आणि कुटुंबाबरोबर गोष्टी शेअर करा. त्या विरोधात आवाज उठवा”, असं दिव्याच्या भावाने लिहिलं आहे. तसेच गगनवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे दिव्याच्या भावाने सांगितले आहे.
संबंधित बातमी वाचा : अभिनेत्री दिव्या भटनागरचे करोनाने निधन