चुकूनही ‘रिसीव्ह’ करू नका ‘तो’ कॉल, होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या

0

नवी दिल्ली : आता हॅकर्स इंटरनॅशनल कॉलच्या  बहाण्याने लोकांना चूना लावत आहेत. याबाबत सरकार सातत्याने लोकांना वॉर्निंग देत आहे. परंतु तरीही लोक यास बळी पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर दूरसंचार विभागसुद्धा (DoT) सतत सर्व मोबाइल यूजर्सला मेसेज पाठवून अशाप्रकारच्या फ्रॉडपासून वाचण्याचा सल्ला देत आहे.

याचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला फोनवर कोणत्याही नंबर शिवाय किंवा इंडियन नंबरवरून इंटरनॅशनल कॉल आला तर DoT चा टोलफ्री नंबर 1800110420/1963 वर ताबडतोब संपर्क करा.

जर तुम्हाला नो नंबर चा कॉल येत असेल तर हा एक फ्रॉड कॉल असू शकतो आणि आणि याची माहिती ताबडतोब DoT ला द्यावी. इतरही टेलीकॉम ऑपरेटर्स सातत्याने अशा कॉलपासून सावध राहण्याची वॉर्निंग देत आहेत. जियो, वोडाफोन आयडिया आणि एयरटेल द्वारे यूजर्सला सतत मेसेज पाठवले जात आहेत की, अशा कोणत्याही कॉल, मेसेज इत्यादीवर विश्वास ठेवू नका.

कसे काम करतो हा इंटरनॅशनल कॉल स्कॅम?
जर इंटरनॅशनल कॉल फ्रॉड बाबत बोलायचे तर सामान्यपणे
यूजर्सला वेगवेगळ्या कंट्री कोडसह कॉल येऊ शकतात जसे +92, +375 इत्यादी. तुम्ही असा कॉल्स
रिसीव्ह करताच सांगितले जाईल की तुम्हाला एखादी लॉटरी लागली आहे किंवा बक्षीस लागले आहे.
एसएमएसद्वारे सुद्धा होऊ शकतो फ्रॉड (SMS fraud)
यासोबतच कॉल करणारी व्यक्ती तुम्हाला पर्सनल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करेल आणि यासोबत प्राईज जिंकण्यासाठी एखादे कमीशन देण्याची मागणी करू शकते. असा फ्रॉड एसएमएसद्वारे सुद्धा केला जाऊ शकतो. अशा एखाद्या नंबरवरून मिस कॉल आला तरी त्यावर कॉल करू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.