पिंपरी : महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये कोविड १९ काळ भविष्यातील रुग्णसंख्या विचारात घेवून २० के.एल. क्षमतेच्या ऑक्सिजन टाकीचा पुरवठा करणेस गॅब एन्टरप्रायजेस यांना पुरवठा आदेश देण्यात आलेला आहे. तसेच याच कंपनीला प्रति किलो ३६.रू दराने पुरवठा करण्यासाठी ही आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु या दराबाबत शहानिशा केली असता आपल्या क्लस्टर येथील कोविड रुग्णालयास प्रति किलो २४.रु या दराने ऑक्सिजन पुरवठा सद्यस्थितीत होत आहे.
वायसीएम रुग्णालयासाठी होणारा ऑक्सिजन पुरवठा तब्बल १२.रु इतक्या जास्त दर आहे. यामुळे मनपाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. असे असतानाही राष्ट्रवादीच्या माजी महापौर कंपनीस ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी १० वर्षे मुदतवाढ देण्यासाठी प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे समजते. यापुर्वी यासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागार कंपनीची २ वर्षे मुदतवाढीची केलेली शिफारस आता संपुष्टात आलेली आहे.
ही कंपनी वायसीएम रुग्णालयासाठी ऑक्सिजन पुरवठा करत असताना संचलन करत असताना कोविड काळामध्ये पाईपलाईनमध्ये दोष निर्माण झाल्याने व कंपनीच्या हलगर्जी पणामुळे रुग्णालयातील जवळपास ९ रुग्णांना जिव गमवावा लागला आहे. ही बाब अतिशय गंभीर स्वरुपाच त्यामुळे गॅब एन्टरप्रायजेस या कंपनीस यापुढे ऑक्सिजन पुरवठा करणेसाठी मुदत वाढ न देता काळ्या यादीत टाकावे. तसेच या कंपनीस यापुढेही महापालिकेस ऑक्सिजन पुरवठा करण्यासंदर्भात कोणतेही काम देवु असे प्रतिपादन नगरसेवक तुषार कामठे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.