मोठ्या आणि फसव्या आमिषाला बळी पडू नका; योग्य शिक्षण घ्या : माडगूळकर
आयटी पार्क मधील 'रुची स्टॉक मार्केट इन्स्टिट्यूट'च्या शाखेचे उदघाटन
पिंपरी : स्टॉक मार्केट मधील गुंतवणूकीकडे अनेकजण वळत असल्याचे दिसत आहे. स्टॉक मार्केट मधील गुंतवणूक वाढत आहे. याच बरोबर फसवणुकीच्या घटनाही समोर येत आहेत. नागरिक यातील अपुऱ्या माहितीमुळे इतरांवर अवलंबून राहतात. महिन्याला 5, 10 टक्के परताव्याच्या मागे धावतात आणि स्वतःची फसवणूक करुन घेतात. त्यामुळे यातील योग्य शिक्षण घेऊन गुंतवणूक करावी असा सल्ला निवृत्त सहायक पोलिस आयुक्त जी.एस. माडगूळकर यांनी दिला.
रुची शेयर मार्केटच्या हिंजवडी शाखेचे उदघाटन माडगूळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना गटनेते, नगसेवक राहुल कलाटे, डब्बल महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे, हिंजवडी सरपंच विशाल साखरे, माजी सरपंच विक्रम साखरे, सामाजिक कार्यकर्ते नंदू भोईर, रुची शेयर मार्केटचे डायरेक्टर दत्तात्रय विभूते, या शाखेचे प्रमुख सागर पवार आणि स्नेहल पवार आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
माडगूळकर पुढे म्हणाले की; समाजात शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करुन दर महिना मोठा परतावा देण्याच्या नावाने फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी सर्वप्रथम परिपूर्ण शिक्षण घ्यावे. त्यानंतर स्वतः स्वतःची गुंतवणूक करावी. यामुळे फसवणुक होणार नाही.
‘शेयर मार्केट’ क्षेत्रात गेली 15 वर्षे शिक्षण देण्याचे काम रुची शेयर मार्केटच्या माध्यमातून डायरेक्टर दत्तात्रय विभूते करत आहेत. ISO9001 प्रमाणित असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून सुमारे 10 हजार हुन अधिक विद्यार्थी शेयर मार्केटचे शिक्षण घेऊन गुंतवणूक करत आहेत.