पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेची ताकद कमी आहे असे कोणी समजू नका : खासदार श्रीरंग बारणे

0
पिंपरी : शिवसेनेचा जन्म आंदोलनातून झाला आहे.आज पर्यंत पिंपरी विधानसभेतून कितेक आमदार आणि नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले आहेत. आणि आता काय झाले.असा प्रश्न शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी उपस्थित केला. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या प्रभागाल्या मतदारांच्या गोरगरीबांच्या सुख दुःखात सहभागी झाले पाहिजे. एकमेकांचे पाय पाठीमागे ओढण्यापेक्षा साथ द्या. असे आवाहन त्यांनी केले आहे.

शिवसेनेने आगामी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे . त्याअंतर्गत शहरात मेळावे घेतले जात आहेत . मिशन 2022 ‘ अंतर्गत पिंपरी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा आज आकुर्डी येथे मेळावा झाला. त्यावेळी मिर्लेकर बोलत होते .
pcmc

शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख बाळा कदम, खासदार श्रीरंग बारणे हे मेळाव्याला मार्गदर्शन केले आहेत. युवासेना संपर्कप्रमुख राजेश पळसकर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख योगेश बाबर, शहरसंघटिका उर्मिला काळभोर, विधानसभा प्रमुख प्रमोद कुटे, अनंत कोऱ्हाळे, विधानसभा संघटिका सरीता साने, अनिता तुतारे, युवासेनेचे जितेंद्र ननावरे, विश्वजीत बारणे, अभिजित गोफण, शर्वरी जळमकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेची ताकद कमी आहे असे कोणी समजू नका. विठ्ठलाच्या मूर्तीचा भ्रष्टाचार केला म्हणून महापालिकेतून राष्ट्रवादीची सत्ता गेली. आणि त्याचे भावनिक राजकारण करत भाजपनी संधी साधली. पण आता असे शिवसेना पक्ष होऊ देणार नाही. येत्या पालिकेच्या निवडणुकीत आम्ही पण रिंगणात आहे. असा इशारा खासदार श्रीरंग बारणे यांनी दोन्ही पक्षांना दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.