‘कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका’ ! : उद्धव ठाकरे

0

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील भाषणानंतर राज्यात मोठी घडामोड होताना दिसत आहे. मशिदींवरील भोंग्यांविरोधात उद्या राज्यभर आंदोलन करणार असल्याचं राज ठाकरे यांनी सभेत म्हटलं होतं. त्यातच आज त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत चर्चा केली. तर दुसरीकडे राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनीही कारवाईचा इशारा दिला. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मोठं विधान केलं आहे.

”राज्यातील स्थितीचा आढावा घेतला असून पोलिसांना योग्य कारवाई करण्याचे निर्देश,’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका, योग्य कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. यावेळी त्यांनी पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका असं ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्याशी फोनवर चर्चाही केली. यावेळी त्यांनी राज्यातील स्थितीची माहिती घेतली आहे.

Maharashtra HM briefed CM Uddhav Thackeray on the law and order situation in the state. CM ordered that Police should take all measures to maintain law & order and not wait for anyone’s order.

Maharashtra DGP & CM had a telephonic conversation, law & order situation discussed.

— ANI (@ANI) May 3, 2022

दरम्यान, ”गृहमंत्र्यांनी कायदा आणि सुव्यस्थेच्या दृष्टीने आढावा बैठक घेतली. महाराष्ट्र पोलीस दल कायदा सुव्यस्थेचा प्रश्न हाताळण्यास सक्षम आहेत. आमची पूर्ण तयारी आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा बिघडू नये यासाठी आम्ही सर्वांना सूचना केल्या आहेत. याआधी समाजकंठक, गुन्हेगार स्वरुपाच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे,” असं डिजीपी रजनीश सेठ म्हणाले.

पुढे रजनीश सेठ यांनी सांगितलं, “कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करु. आम्ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई केली असून नोटीस पाठवल्या आहेत. एसआरपीएफच्या 87 तुकड्या आणि 30 हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात आहेत. कोणत्याही प्रकारे कायदा सुवयवस्था राखावी यासाठी त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच, 15 हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली असून 13 हजार लोकांना नोटीस पाठवण्यात आले असल्याचंही,” ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.