पिंपरी : दापोडी येथे पत्नी-पत्नीच्या खूनाने शहर हादरले होते. हे दोन्ही खून आरोपीने पुर्ववैमनस्यातून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मयतांनी दिलेल्या जुन्या त्रासातून त्याने हा खून केल्याचे समोर आले आहे.
शंकर नारायण काटे (वय 60), संगीता शंकर काटे (वय 55) अशी खून झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. प्रमोद त्र्यंबक मंगरुळकर (वय 45) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत इसमाने सन 2019 पूर्वी झालेल्या वैयक्तिक अत्याचारावरून व मयत महिलेने त्यास मदत केलेली असल्याचे समजातून त्याचा राग मनात धरून त्याने हा खून केल्याचे आरोपीने कबुल केले आहे. अटक आरोपी हा नोव्हेंबर 2015 ते सप्टेंबर 2017 या कालावधीत मयत यांचे मालकीचे नमूद ठिकाणी इमारतीत भाडेकरू म्हणून राहत असे.
त्यावेळी मयत इसमाने वेळोवेळी त्याच्या कुटुंबावर अत्याचार केले असल्याचा राग त्याच्या मनात होता.आरोपी काही वेळ पुण्यात राहून नंतर दिल्ली येथे युपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्ली येथे गेलेला होता. झालेल्या अत्याचाराची त्यास नेहमी मनात चीड असल्याने त्याने दिल्ली येथून येऊन सोबत आणलेल्या टिकावाने शंकर काटे व संगिता काटे यांच्यावर टिकावाने वार करत खून केला. पुढे तो रक्ताने माखलेला टिकाव घेऊन तो दापोडी येथे रस्त्यावर फिरत होता. स्थानिक नागरिकांनी त्याला थांबवून ठेवून पोलिसांना याबाबत माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शंकर आणि संगीता हे दोघे रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत पडले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आरोपीला अटक केले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.