अपात्र ठेकेदारांना पात्र ठरविण्यासाठी बनावट दाखले देऊन करोडो रुपयांचे काम घेण्याचा डाव आखला होता. पालिकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्याचा कट रचणा-या आरोग्य विभागातील या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे आव्हान आयुक्त राजेश पाटील यांच्यापुढे निर्माण झाले आहे.
पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीपात्रात वाढलेल्या जलपर्णीमुळे लगतच्या भागात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याचा लगतच्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. डासांच्या प्रादुर्भावामुळे साथिचे रोग पसरण्याची भिती निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉल जाणिवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. नागरिकांना होणा-या त्रासाबद्दल त्यांना कसलीही काळजी वाटत नाही.
तसेच, रस्ते, गटर साफसफाईच्या निविदा प्रक्रियेत ठेकेदारांना पोसण्यासाठी बनावट दाखले देण्याचा उद्योग केला. आरोग्य विभागाच्या विविध कामांच्या निविदा प्रक्रियेत अफरातफर करण्यात त्यांचा हात आहे. त्यामुळे डॉ. अनिल रॉय यांच्यावर त्वरीत कारवाई करण्याची मागणी महापौर उषा ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर हिराबाई घुले यांनी पत्रकारांशी सवांद साधला तेव्हा सांगितले.