मुंबईत ड्रग्ज बनवणाऱ्या फॅक्टरीचा पर्दाफाश

0

मुंबई : बॉलिवूड क्षेत्रात ड्रग्ज मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते हे सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर समोर आले. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबईत सुरु असलेल्या ड्रग्ज बनवणाऱ्या फॅक्टरीचा पर्दाफाश केला आहे.

अंडरवर्ल्ड दाऊदशी थेट संबंध असणाऱ्या अरिफ भुजवाला याच्या घरात कारवाई केली आहे. डोंगरी भागात घरातच दहा ते बारा किलो वेगवेगळ्या ड्रग्जसोबत ड्रग्स बनवणारी एक फॅक्टरी देखील सापडली आहे. ही फक्टरी चालवण्यामागे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम आणि कुख्यात तस्कर कैलास राजपूत असल्याचे समोर आले आहे.

आरिफच्या घरी तब्बल दोन कोटी 18 लाख रुपयांची रोकड देखील एनसीबीला सापडली आहे. ही फॅक्टरी चालवणारा सराईत आरोपी आरिफ भुजवाला हा सध्या फरार आहे. नवी मुंबईतील घणसोली येथील कारवाईत दाऊदचा हस्तक आणि गँगस्टर चिकू पठाण याला अटक केली आहे. त्यामुळे या फॅक्टरीचे धागेदोरे मिळाले.

Leave A Reply

Your email address will not be published.