अरबी समुद्रात ४९०० कोटी रुपयांचा अमली पदार्थ, AK47 आणि जिवंत काडतुसे पकडली

0

मुंबई : अरबी समुद्रात तटरक्षक दलाच्या युद्धनौकेने घातपाताचा डाव उधळला आहे. संशयित नौकेला घेराव घालून जवळपास ४९०० कोटी रुपयांचा अमली पदार्थाचा साठा आणि पाच AK47 रायफल आणि १ हजार जिवंत काडतुसे जप्त केली आहे.

लक्षद्विपजवळील मिनीकॉस येथे ही कारवाई करण्यात आली. ३०० किलो हिरोईन हा अमली पदार्थ जप्त केला आहे. त्यामुळे २६/११ हा मुंबईवर झालेला भीषण दहशतवादी हल्ला देखील भारतीय बोटी ताब्यात घेऊन दहशतवाद्यांना मुंबईत शिरकाव केला होता.

अमली पदार्थाचा साठा, ५ रायफली आणि काडतुसे घेऊन भारतीय किनारपट्टीवर येत असलेल्या नौकेला घेराव घालून हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. तटरक्षक दलाकडून संशयित नौकेला घेरून त्याची तपासणी करण्यात आला.

त्यावेळी नौकेमध्ये तब्बल ४९०० कोटी रुपयांचे ३०० किलो अमली पदार्थ सापडले याशिवाय पाच एके ४७ रायफल तसेच १ हजार जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली. समुद्री संरक्षण मोहिमेंतर्गत समुद्री तसेच हवाई समन्वयाने ही कारवाई करण्यात आली. लक्षद्वीपजवळील मिनीकॉय येथे ही थरारक कारवाई करण्यात आली.

तटरक्षक दलाची गस्ती नौका गस्त घालत असताना तीन मच्छिमार नौका संशयास्पद स्थितीत दिसून आल्याची माहिती मिळाली. विमानाने टेहळणी करून संबंधित नौकांबद्दल अधिक माहिती मिळवून नेमके ठिकाण गस्तीवर असलेल्या नौकेला कळवण्यात आले. त्यानुसार गस्ती नौकेने या तिन्ही मच्छिमार नौकांना घेराव घातला.

तीनपैकी रवीहंसी ही श्रीलंकन मच्छिमार बोट अमली पदार्थ व रायफल घेऊन भारतीय किनारपट्टीवर येत होती. अन्य दोन नौका तिला संरक्षण पुरवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तिन्ही नौकांसह त्यावरील १९ खलाशांना तटरक्षक दलाने ताब्यात घेत मोठ्या घातपाताचा कट उधळला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.