28 कर्मचाऱ्यांवर कोरोना लसीकरणाची ड्राय रन

0

पिंपरी : महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयात 28 कर्मचाऱ्यांवर लसीकरणाची रंगीत तालीम (ड्राय रन) घेण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात एकालाही लस टोचण्यात आली नाही.

ड्राय रनवेळी आरोग्य विभागाच्या संचालका डॉ. अर्चना पाटील, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा डॉ. दिलीप पाटील, उपसंचालक (आरोग्य सेवा) डॉ.संजय देशमुख, ‘युनिसेफ’चे सल्लागार डॉ.सतिष डोईफोडे, सर्वेलन्स मेडिकल ऑफिसर (डब्ल्यु.एच.ओ.) डॉ.चेतन खाडे, रिजनल टिम लिडर डॉ. राहुल शिंपी, लस व शितसाखळी व्यवस्थापक निरज गुप्ता, महापालिका अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ.पवन साळवे, जेष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ.संगिता तिरुमणी, डॉ. बाळासाहेब होडगर, वैद्यकिय अधिकारी डॉ. श्रीकांत सुपेकर, डॉ.वर्षा डांगे, पीएचएन शोभा ढोले उपस्थित होते.

कोरोना वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून प्राप्त सुचनांनुसार कोरोना लसीकरणाबाबतचे नियोजन करण्यात येत आहे. शासन मार्गदर्शक सुचनेनुसार कोरोना लसीकरणाची ड्राय रन (रंगीत तालीम) आज देशभर घेण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.