करोनामुळे तीन ‘खान’ यांचे चित्रपट रिलीज झाले नाहीत

0

मुंबई ः करोनामुळे बाॅलिवुडमधील सिनेतारकांसाठी २०२० हे वर्षे खूपच अडचणीत गेलेले आहे. प्रसिद्ध अभिनेत्यांचे चित्रपट यावर्षी रिलीज झाले नाहीत. लाॅकडाऊनमुळे बऱ्याचशा चित्रपटांची चित्रीकरण थांबविण्यात आले. त्यामुळे बाॅलिवुडला सर्वात जास्त फटका बसलेला आहे. यावर्षी कोणकोणत्या अभिनेत्यांचे सिनेमे रिलीज झाले नाहीत, यासंबंधी पाहू या…

सलमान खान ः दरवर्षी ईद पाहून आपले चित्रपट रिलीज करणाऱ्या सलमानला यंदा कोणताही चित्रपट रिलीज करता आलेला नाही. खरंतर यंदा ‘राधे : युअर मोस्ट वाॅन्टेड भाई’ हा सिनेमा रिलीज होणार होता. मात्र, करोनामुळे शक्य झाले नाही. चित्रीकरण पूर्ण झाले. पण, पोस्ट प्रोडक्शनचे काम राहिलेले आहे. चित्रपट पूर्ण होणार यावर अद्यापतरी भाष्य करण्यात आले नाही.

शाहरुख खान ः २०१८ पासून किंग खान मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना दिसला नाही. जिरो सिनेमा फ्लाॅप ठरल्यानंतर शाहरुख दिसलाच नाही. त्याच्या चाहत्यांना असे वाटले की, २०२० तो दिसेल मात्र, करोनामुळे ते शक्य झाले नाही. सद्या शाहरुख ‘पठाण’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. कदाचित नव्या वर्षात म्हणजेच १ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.

अमीर खान ः मि. परफेक्शनिस्ट म्हणजे अमीरची अवस्थाही यापेक्षा काही वेगळी नाही. २०२० मध्ये ‘लाल सिंह चढ्ढा’ या सिनेमातून प्रेक्षकांना अमीर दिसणार होता. मात्र, करोनामुळे या सिनेमाचे चित्रीकरण थांबविण्यात आले. या चित्रपटात अभिनेत्री करिना कपूर आहे. शुटींग पूर्ण झाली आहे. कदाचित ख्रिसमसचे निमित्त साधून हा चित्रपट रिलीज होऊ शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.