पिंपरी : पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरातील अवैधरित्या सुरु असलेले सर्व धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र स्थानिकांच्या मर्जीने आयुक्तांचे आदेश डावलून धंदे राजरोसपणे सुरु आहेत.
किवळे येथे हुक्का विक्री करणाऱ्या हॉटेलवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या हॉटेलकडे हुक्का विक्री करण्याचा परवाना नसल्याच कारवाईत दिसून आलं आहे.
अवैधरित्या हुक्का विक्री करणाऱ्या हॉटेलवर रावेत पोलिसांनी कारवाई केली. हृषीकेश कस्पटे व आत्माराम कस्पटे (रा. उत्तम निवास, छत्रपती चौक, वाकड) हे दोघे आरोपी पळून गेले आहेत. याप्रकरणातील तिसरे आरोपी हॉटेलचा जागा मालक शुभम धुमाळ, रा. किवाळेगाव हा आहे.
पोलिसांनी काल संध्याकाळी 6.30 वा च्या सुमारास किवळेगाव बापदेव मंदिर जवळ असलेले बॅचलर फॉरेस्ट अँड रेस्टो येथे ही कारवाई केली. कस्पटे हे त्यांच्याकडे तांबखुजन्य हुक्का विक्री करण्याचा परवाना नसतानाही स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता हुक्का विक्री करीत होता.
पोलिस आल्याची चाहूल लागताच ते अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत. तसेच या अवैध धंद्यासाठी त्यांना धुमाळ यांनी हॉटेलची जागा उपलब्ध करून दिली असल्याच तपासात उघडकीस आले आहे.
सर्व आरोपींच्या विरोधात भा. द. वि. कलम 269, 270, 35)4 सह सिगारेट व अन्या तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम सन 2003 चे कलम 4, 21 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.