लॉकडाऊनच्या काळात 23 टक्के लोकांनी मुंबई सोडली

0

मुंबई : लॉकडाउनच्या काळात मुंबईतून 23 टक्के लोक बाहेर पडले असून यातील 57 टक्के लोकांनी काम गेल्याने मुंबई सोडत असल्याचे सांगितले आहे.  त्यापैकी 80 टक्के सामाजिक-आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरातील (SEC-E) नागरिक असल्याचा अहवाल प्रजा फाऊंडेशनने मांडला आहे.

प्रजा फाउंडेशनचा हा अहवाल गुरुवार, दिनांक 28 जानेवारी रोजी प्रकाशित झाला. महामारी व लॉकडाऊनमुळे शहराच्या सामाजिक-राजकीय व आर्थिक परिस्थितीवर बराच प्रभाव पडल्याचे जाणवल्याने या प्रभावाचे नेमकेपणाने विश्लेषण करण्यासाठी कुटुंब सर्वेक्षण करण्यात आले. उपजिविका, आरोग्य, शिक्षण, घरे आणि परिवहन या महत्त्वाच्या घटकांबात प्रजाने हंसा रिसर्चच्या (Hansa Research) सहाय्याने केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष या अहवालात सादर केले आहेत’, असे प्रजाचे संस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त निताई मेहता यांनी सांगितले.

‘सर्वच क्षेत्रातील उपजिविका आणि रोजगाराला फटका बसलेला आहे.  टाळेबंदीमुळे नोकरीवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे प्रत्येक तीन व्यक्तीपैकी दोघांनी सांगितले आहे.  नोकरीवर प्रतिकूल प्रभाव पडला असे म्हणणाऱ्या लोकांची संख्या ही 36 टक्के आहे तर 28 टक्के लोकांचा पगार कमी केला गेला.  25 टक्के लोकांनी बिनपगारी काम केले आणि 13 टक्के लोकांनी जादा तास काम केल किंवा त्यांच्यावरील कामाचा भार वाढला’, अशी माहिती प्रजाचे संचालक मिलिंद म्हस्के यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.