मुंबई : दसरा मेळावा परंपरेप्रमाणे शिवतीर्थावरच घेणार. आतापर्यंत मुले पळवणारी टोळी ऐकली, पण सध्या बाप पळवणारी टोळीमहाराष्ट्रभर फिरत आहे. ज्यांना सत्तेचे दूध पाजले, मानमरातब दिला. आता त्यांनी तोंडाची गटारे उघडली आहेत, असा घणाघातबुधवारी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
ठाकरे शिवसेनेच्या गोरेगाव येथील गटप्रमुखांचा मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्याला शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. यावेळीठाकरे यांनी अपेक्षेप्रमाणे शिंदे गटासह अमित शहांचाही समाचार घेतला.
ठाकरे म्हणाले, व्यासपीठावर मी एक रिकामी खुर्ची पाहिली. ती संजय राऊत यांची आहे. मी आत्ताच खूलासा करतो. संजय राऊत हेमोडेन पण वाकणार नाही, या निश्चयाने लढत आहेत. लढाईत ते सोबत आहेत. सर्वात आघाडीवर ते आहेत. व्यासपीठावर आल्यानंतरवडील जागेवर आहेत का नाही हे मी पाहिले.
उद्धव ठाकरे म्हणाले, व्यासपीठावर आल्यानंतर वडील जागेवर आहेत का नाही पाहिले. मुले पळवणारी टोळी ऐकली, पण सध्या बापपळवणारी टोळी महाराष्ट्रभर फिरते आहे. यांना सत्तेचे दूध पाजले. मानमरातब दिला. आता त्यांनी तोंडाची गटारे उघडली आहेत.
ठाकरे म्हणाले, सध्या गिधाडाची टोळी फिरते आहे. निजामशहा, आदिलशहा आले आणि गेले. त्याच कुळातले अनेक शहा. मी गिधाडशब्द मुद्दाम वापरला. मुंबईत संकटात असते, त्यावेळेस ही गिधाडे कुठे असतात. ही जमीन नाही. आमची मातृभूमी आहे. जो आमच्याआईवर वार करायला येईल, त्याचा राजकारणात कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही.
ठाकरे म्हणाले, संय़ुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती. त्या लढाईत जनसंघ नव्हता. जेव्हा लढाई सुरू होती तेव्हा माझे आजोबा होते. पहिल्या पाच अग्रणी नेत्यात माझे आजोबा होते. तेव्हा रण पेटले होते. तेव्हा निवडणुका लागल्या. त्यावेळी जनसंघाने मराठी माणसांचीसंघटना फोडली. केवळ राजकीय स्वार्थासाठी. आता राज्यातील हिच त्यांची औलाद आहे.