एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी; पंकजा मुंडे यांचे भाष्य

0

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. खडसेंना पुन्हा ईडीकडून बोलावणं येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर, खडसेंच्या चौकशीवर मीडियातून भाष्य करणं योग्य होणार नाही. कारण मी काही एक्सपर्ट नाही, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.

एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरू होत असून हा राजकीय डाव असल्याचं राष्ट्रवादीने म्हटलं आहे. खडसे यांनीही या कारवाई मागे राजकीय सुडाचा वास येत असल्याचं म्हटलं आहे. त्यावर पंकजा मुंडे यांना विचारण्यात आल. त्यावर त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. मला वाटतं ईडी, सीबीआय, सीआयडी या मोठ्या संस्था आहेत. त्यात आपण कमी बोलू तेवढं योग्य आणि न्याय होईल. चूक असेल तर त्याचा न्याय होईल. बरोबर असेल तर त्याचाही न्याय होईल. त्याला आपण कुठे डिस्टर्ब करू नये. खडसेंच्या चौकशीवर मीडियातून भाष्य करणं योग्य होणार नाही. कारण मी काही एक्सपर्ट नाही, असं पंकजा म्हणाल्या.

प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चांवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्हाला मंत्रिपद मिळालं नाही. म्हणून नाराज होण्याचं कारण नाही. माझ्या घरात कोणताही पूर आला नाही. माझं घर वाहून गेलं नाही. मी कुठेही आश्रित होण्याचा अर्ज करत नाहीये. मग माझं पुनर्वसन कोणी कशाला करेल? असा सवाल करतानाच जे बरबाद झालेत. जे वाहून गेलेत. जे खत्म झाले आहेत. त्यांचं पुनर्वसन केलं जातं. पुनर्वसन शब्द मला मान्य नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. माझ्या मनात कोणतीही आपत्ती नाही. हा पक्षाचा निर्णय आहे. अशा निर्णयातून मी गेली आहे. मात्र, कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल असते. नाराजी असते. हे नाकारता येत नाही. पण माझ्या आणि कुटुंबाच्या मनात नाराजी नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.