संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस

0

मुंबई ः महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांच्या घरामध्ये ई़डीच्या नोटीसा सारख्या येतच आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीची धाड पडली. नंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी नुकतीच ईडीची चौकशीसाठी नोटीस आली आहे आणि आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनादेखील ईडीची नोटीस आली आहे.

पीएमसी बॅंक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांनी ईडीची नोटीस आली आहे. २९ डिसेंबर रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे ईडीच्या नोटीसमध्ये सांगितले आहे. कलम ६७ अंतर्गत ही नोटीस पाठविण्यात आली आहे, त्यामुळे वर्षा राऊत यांचीही आता चौकशी होणार आहे.

पीएमसी बॅंक घोटाळ्याप्रकरणी काहीजणांची चौकशी सुरू आहे, त्यातीलच एका जुन्या प्रकारच्या चौकशी वर्षा राऊत यांचे नाव समोर आल्यामुळे त्यांनी समन्स बजावण्यात आलं आहे. यावर खासदार संजय राऊत किंवा वर्षा राऊत यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. काही दिवसांपासून खासदार राऊत यांनी भाजपावर टीकेची झोड उठविली आहे, अशा परिस्थितीत राऊत कोणती भूमिका घेताहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.