पुणे : महाराष्ट्रात सध्या ईडी अॅक्टिव्ह मोडवर असून सकाळपासून ईडीचे धाडसत्र चालू होते त्यामुळे कोणत्या तरी ठिकाणी मोठी कारवाई होणार याचा अंदाज होता. अशातच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीने कारवाई केल्याची माहिती समजत आहे. उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तेवर ईडीने कारवाई केली आहे.
ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 प्लॅट जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये जवळपास 6.45 कोटींच्या मालमत्ता जप्त केली आहे. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आणि उद्धव ठाकरेंचे मेहुणे आहेत. यापूर्वी मनी लाँड्रिग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज याच मालमत्तेवर ईडीने कारवाई केल्याची माहिती
दरम्यान, ईडीने थेट मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांवर कारवाई केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.