पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज पहाटे 6 वाजताच अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापे टाकले आहेत.
हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीसह आयकर विभागानेही छापे टाकल्याची माहिती आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले होते.
अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या जावयासह 100 कोटींचा घोटाळा केला, असा आरोप सोमय्यांनी केला होता. या प्रकरणीच ही छापेमारी असल्याचे सांगण्यात येत आहे.