पुणे : व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीज आणि उद्याेजक विनाेद खुटे व त्यांचे नातेवाईक यांच्याद्वारे व्यवस्थापित व नियंत्रित मेसर्स ग्लाेबल एफिलिएट व्यवसायाद्वारे फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी (इडी) अंमलबजावणी संचालनायलयाने २५ मे पासून छापेमारी सुरू केली. आतापर्यंत याप्रकरणी पुणे व अहमदनगर येथील कंपनीशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी करुन राेख रक्कमेसह, बँकेतील विविध खात्यातील एकूण १८ कोटी ५४ लाख रुपये किंमतीची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती ईडीने शुक्रवारी दिली आहे.
ईडीने उद्याेजक विनाेद खुटे व इतरांविरुध्द फेमा कायदा १९९९ चे उल्लंघन केल्याप्रकरणी तपास सुरु केला. खुटे सध्या दुबई मध्ये राहून विविध बेकायदेशीर व्यापार, क्रिप्टाे एक्सचेंज, वाॅलेट सेवा व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपन्यांच्या माध्यमातून चालवत आहे. त्यातून मिळालेली रक्कम हवालाद्वारे विविध देशात पळवली जात हाेती.
ईडीच्या चाैकशीत असे निष्पन्न झाले आहे की, मेसर्स ग्लाेबल एफिलिएट बिझनेस द्वारे ई -काॅर्मस शाॅर्पिंग पाेर्टलद्वारे विविध उत्पादनांची विक्री करुन संलग्न विपणन व्यवसायाचे मार्केटिंग केले जात हाेते. त्यासाठी ग्लाेबल एफिलिएट बिझनेस नावाचा अॅप्लिकेशनचा वापर करण्यात येत हाेता. हा व्यवहार बेकायदेशीर व अनाधिकृतरित्या साखळी पद्धतीने चालवला जात हाेता. ज्यात जर एखाद्या व्यक्तीने सदस्य म्हणून कोणत्या याेजनेची निवड केली आणि त्याबाबतचा अर्ज/वेबसाईटवर इतर ग्राहक यांचा संर्दभ दिला तर त्याच्यावर कमिशन संबंधितांना त्यांचे खात्यावर मिळत हाेते.
अशाप्रकारे विविध गुंतवणुकदारांकडू १२५ कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. ईडीचे तपासात ही बाब समाेर आली की, व्याज/कमिशनच्या नावाखाली विविध गुंतवणुकदारांकडून शेल कंपन्या, फर्मच्या नावाखाली बँकिंग चॅनलद्वारे तसेच राेख स्वरुपात १२५ कोटीहून अधिक रक्कम गाेळा केली गेली आहे. त्यामुळे फेमा कायद्याचे उल्लंघन प्रकरणी कंपनीचे बँकेतील १७.२२ कोटी रुपये गाेठवले गेले आहे.