राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी

0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची सक्तवसुली संचालनालयाने चौकशी सुरु केली आहे. डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर यांची गेल्या काही दिवसांपासून ईडीने चौकशी केली होती. त्यातून मिळालेल्या माहितीवरुन मलिक यांची चौकशी सुरु असल्याचे बोलले जात आहे.

NCP leader and Maharashtra Minister Nawab Malik arrives at the office of the Enforcement Directorate in Mumbai. Details awaited.

(File photo) pic.twitter.com/vYMmvovKsQ

— ANI (@ANI) February 23, 2022

ईडीचे एक पथक पहाटे ५ वाजता नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले. तेव्हा नवाब मलिक यांनी आपणच ईडीच्या कार्यालयात ७ वाजता येतो, असे सांगितले. त्यानुसार सकाळी ७ वाजता नवाब मलिक हे ईडी कार्यालयात पोहचले. तेथे त्यांची चौकशी केली जात आहे.

मनी लॉड्रिंगच्या प्रकरणात नवाब मलिक यांची ईडी अधिकार्‍यांकडून चौकशी सुरु आहे. १९९३ मधील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीची जमीन नवाब मलिक यांनी घेतल्याचा आरोप भाजपने काही दिवसांपूर्वी केला होता. त्यावर मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला होता.

NCP leader and Maharashtra Minister Nawab Malik arrived at the office of the Enforcement Directorate in Mumbai. He was summoned by ED in connection with a property with alleged links to the underworld, questioning is underway. pic.twitter.com/34aULItS10

— ANI (@ANI) February 23, 2022

दाऊद इब्राहिम हा भारतात अशांतता माजविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे एनआयएला संशय असून त्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वेगवेगळ्या सुरक्षा एजन्सीजकडून तपास केला जात आहे. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर हा दाऊदचे नाव वापरुन जमीन व्यवहार करत असतो. त्यात मनी लॉड्रिंग झाल्याचा संशय आहे. इक्बाल कासकर याच्याकडे ईडीने चौकशी केली होती. त्यात कासकर याने मलिक यांचे नाव घेतल्याचे सांगितले जाते. त्यातूनच मलिक यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे.
नवाब मलिक यांची चौकशी सुरु झाल्याने राज्यात पुन्हा एकदा राजकीय घमासान सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजप व मोदी सरकारवर मलिक हे आरोप करीत असल्याने त्यांचे तोंड बंद करण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे. दरम्यान, ईडीच्या कार्यालयाबाहेर कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. बॅरिकेट लावून परिसरात लोक जमू नये, अशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.