आता ED उघडणार आघाडी सरकारची ‘फाईल’?

0

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना ED ने नोटीसा बजावल्यामुळे आणि चौकशी सुरु केल्या आहेत. यातच आता ईडीने राज्य सरकारच्या कृषी विभागाकडे लक्ष वळवले असून 2007 ते 2014 या काळात कृषी विभागातील सूक्ष्म सिंचन योजनेत घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे त्याची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन 1 वर्ष पूर्ण झाले आहे. पण, आता नवीन वर्षात महाविकास आघाडी सरकारपुढे एकएक अडचणी वाढत चालल्या आहे. नेते आणि आमदारांपाठोपाठ ईडीची नजर आता राज्य सरकारच्या कृषी विभागावर आहे. 2007 ते 2014 च्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार असताना कृषी विभागामार्फत चालवण्यात सूक्ष्म सिंचन योजनेत घोटाळा झाल्याची शंका ईडीला आहे. अंदाजे 800 कोटींचा हा व्यवहार असून यात मोठ्या कंपन्यांचा सहभाग आहे. याची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.

आधीच ED ने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांना नोटीसा पाठवल्या आहेत. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही समन्स बजावला आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनाही भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात नोटीस बजावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.