मुंबई : मागील अनेक दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. यामुळे राज्यात राजकीय वाद निर्माण झाला आहे. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यामागे देखील ईडीचा ससेमिरा लागला असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अलिबागमधील 8 प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे. त्यासंदर्भात आता विरोधीपक्ष असलेल्या भाजपाकडून संजय राऊतांना लक्ष्य केलं जात आहे.
Enforcement Directorate attached Shiv Sena leader Sanjay Raut’s property in connection with Rs 1,034 crore Patra Chawl land scam case, the agency said.
(File pic) pic.twitter.com/ocaQgh2Jnt
— ANI (@ANI) April 5, 2022
दरम्यान, मुंबईतील 1 हजार 034 कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. याबाबत करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. याबाबत ईडीने कारवाई केली असल्याची माहिती मिळत आहे.