बिटकॉईन प्रकरणात ‘ईडी’ची उडी

0
पुणेः बिटकॉईन या आभासी चलनाच्या (क्रिप्टोकरन्सी) फसवणूक प्रकरणात मदतीसाठी घेतलेल्या दोघा सायबर तज्ञांनाच पुणे सायबर पोलिसांनी अटक केल्यानंतर आता या प्रकरणात अमंलबजावणी संचलनालयाने (ईडी) उडी मारली आहे. या प्रकरणाविषयी या क्रेद्रिय तपास यंत्रणेेने तपास अधिकार्‍यांकडून प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. राज्यातील बिटकाईन तसेच इतर आभासी चलन प्रकरणातील फसवणुकीचा बारा प्रकरणात ईडी तपास करत आहे. त्याच अनुषंगाने या प्रकरणात समांतर तपास सुरु केला असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.
सायबर तज्ञ पंकज प्रकाश घोडे (रा. ताडीवाला रोड) आणि सेवानिवृत्त पोलिस अधिकारी रवींद्र प्रभाकर पाटील (रा. बिबवेवाडी) अशी दोघांची नावे आहेत. दोघेही सायबर तज्ञ म्हणून पोलिसांना बिटका’ईनच्या तपासात मदत करत होते. मात्र तपासात शासनाची फसवणूक करत संशयास्पद कृती केल्याचे चौकशीत आढळल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली होती. दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. सायबर तज्ञांनीच आरोपींच्या वॉलेटमधून बिटकॉइन (क्रिप्टोकरन्सी) हे आभासी चलन परस्पर स्वत:च्या नातेवाईकांच्या नावावर वळविल्याच्या प्रकरणाचा ई डीने या प्रकरणात तपास सुरू केला आहे.
या गुन्ह्याच्या तपासात मालमत्ता जप्त करताना दोन्ही सायबर तज्ज्ञांची भूमिका संशयास्पद असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर सुमारे 9 महिने तपास केल्यानंतर त्यांनी काही क्रिप्टोकरन्सी) परस्पर आपल्या नातेवाईकांच्या नावावर ट्रान्सफर केल्याचे आढळून आले होते. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना अटक केली. भारद्वाज बंधुनी देशभरातील विविध ठिकाणच्या लोकांची फसवणूक केली आहे. त्याचा तपास ईडीकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, ई डीचे काही अधिकारी बुधवारी पुणे पोलीस आयुक्तालयात आले होते. त्यांनी पंकज घोडे व रवींद्र पाटील यांची संपूर्ण माहिती पुणे पोलिसाकडून घेतली.
Leave A Reply

Your email address will not be published.