मुंबई ः दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना अचानक रक्तदाबाचा त्रास होत असल्यामुळे रुग्णालयाच दाखल करण्यात आले होते. हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात रजनीकांत यांनी उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांचा रक्तदाब नियंत्रणात येण्यासाठी डाॅक्टर त्यांना औषधे देत आहेत.
रजनीकांत यांनी विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यांच्या रक्तदाबामध्ये चढउतार पाहायला मिळाला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. चाहते रजनीकांत ठीक व्हावेत म्हणून प्रार्थना करत आहेत. त्यामध्ये कमल हसन यांनीदेखील रजनीकांत यांना बरे वाटावे म्हणून प्रार्थना केली आहे.
जोपर्यंत त्यांचा रक्तदाब नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत त्यांनी रुग्णालयातून सोडले जाणार नाही, असे रुग्णालयाच्या प्रशासनाने सांगितले आहे. रजनीकांत ‘अन्नाथे’ या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त होते, तेव्हा त्यांना करोना संसर्ग झाला होता. २२ डिसेंबरपर्यंत त्यांची चाचणी की निगेटिव्ह आलेली होती. तरीही त्यांना आठवड्यांसाठी विलगीकरणात ठेवण्यात आले होते. नंतर शुक्रवारी त्यांची अचानक तब्येत खराब झाली. रक्तदाबामध्ये चढउतार आहे, त्यासंबंधी औषधे दिली जात आहेत.