चाकणच्या कुरूळी परिसरातून आठ किलो गांजा जप्त

0
पिंपरी : कुरुळी येथे गांजा बाळगणाऱ्याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून आठ किलो 154 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. तात्या मदन काळे (21, रा. खटाटे वस्ती, सोरतापवाडी, ता. हवेली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरूळी गावातील ज्ञानराज मंगल कार्यालयाजवळ एक तरुण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली. काळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये आठ किलो 154 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा आणि इतर साहित्य असा एकूण एक लाख 69 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त ( गुन्हे ) सुधीर हिरेमठ, पोलीस उपआयुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, महाळुगे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) दशरथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस अंमलदार राजु कोणकेरी, अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर, शिवाजी लोखंडे, संतोष काळे, हिरामन सांगडे, अजय गायकवाड, श्रीधन इचके, शरद खैरे यांनी केली.
Leave A Reply

Your email address will not be published.