मुंबई : राज्यातील बंडखोर आमदार मुंबई कधी येणार? हा प्रश्न अनेकांना होता. शिंदे गटातील आमदार बुधवारी सायंकाळी गुहावटीहून गोव्याच्या दिशेने निघालो आहेत.गुहावटीहून विशेष विमान गोव्यासाठी रवाना होणार आहे. गोव्यातील ‘ताज हॉटेल’मध्ये बुधवारची रात्र शिंदे गटातील आमदार काढणार आहे. गुरुवारी आमदार मुंबईत दाखल होतील.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ३० जून रोजी बहुमत चाचणी घेण्यासाठी पत्र लिहीले आहे. शिंदे गटातील आमदार गुरुवारी मुंबईला येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. गुहावटीत हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सायंकाळी गोव्याला सर्व आमदार दाखल होतील. दरम्यान, आमदार येणार असल्याने दोन्ही विमानतळावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे.
मंगळवारी रात्री उशीरा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल यांची भेट घेतली. यावेळी फडणवीस यांनी राज्यपालांना महाविकास आघाडीकडे बहुमत नसल्याचे पत्र दिले. सरकार अल्पमतात असून बहुमत चाचण्या घ्यावी, अशी विनंती करणारे पत्र त्यांनी राज्यपालांना दिले.
राज्यपालांनी पत्राद्वारे उद्धव ठाकरे सरकारला विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश पत्राद्वारे दिले आहेत. आमदार दाखल झाल्यावर त्यांना विधानभवन पोलीस संरक्षण द्यावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.