40 आमदारांचा गट घेऊन एकनाथ शिंदे राज्यपालांना भेटणार

0

मुंबई : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेनेत उभी फुट पडली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात मंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या 40 आमदारांच बंड आणखी तीव्र होत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे   आज दुपारी राज्यपालांना भेटून भाजपला पाठींबा असल्याचे सांगणार आहेत. या सर्व घडामोडींमुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दुपारी राज्य मंत्रीमंडळाची तातडीची बैठक बोलविली आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून समजूत काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्याशी चर्चा सुरु आहे. तरीही शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. एकनाथ शिंदे यांच्याशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फोनवर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत ते म्हणाले की भाजपसोबत जाव हिच पक्ष हिताची भूमिका आहे. मला तुमच्याकडून आश्वासन हवं आहे. मला मंत्रीपद नको पण भाजपसोबत सरकार बनवा.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूकीमध्ये मतांची जुळवाजुळव केली ती पाहता एकनाथ शिंदे यांच्या दाव्यानुसार जर 40 शिवसेना आमदार असतील तर सत्तेची गणिते बसवण भाजपसाठी कठीण जाणार नाही, असं चित्र दिसत आहे.भाजपचे 106 आमदार, एकनाथ शिंदेंना समर्थन करणारे 40 आणि अपक्ष अशी मोट बांधून भाजप बहुमताचा 145 चा आकडा गाठू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.