महाराष्ट्र विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर

0

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या 10 डिसेंबर रोजी मतदान आणि 14 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

विधान परिषदेच्या एकूण 8 जागांचा कार्यकाळ संपुष्टात येत असला तरी सोलापूर आणि अहमदनगर वगळता मुंबईतील दोन कोल्हापूर, धुळे, नंदुरबार, अकोला, बुलढाणा, वाशीम या सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

रामदास कदम, भाई जगताप, सतेज पाटील, अमरिश पटेल, गिरिष व्यास, गोपाल किशन बाजेरिया यांच्या जागांवर निवडणूक होणार आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात निवडणुकीचा धुरळा पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या निवडणुकीमध्ये आता राज्यातील महाविकास आघाडी एकत्र लढणार की सर्व पक्ष वेगवेगळे लढणार याबाबत उत्सुकता आहे. यापूर्वी काँग्रेसने अनेक वेळा स्वबळावर नारा दिला होता त्यामुळे काँग्रेस स्वबळावर मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे प्रत्यक्ष पक्ष आपली ताकद दाखवण्याची तयारीत आहे. त्यामुळे आगामी निवडणूक मोठी चुरशीची होणार हे निश्चित आहे.

निवडणूक कार्यक्रम –

अधिसूचना जाहीर – 16 नोव्हेंबर

अर्ज दाखल करण्याचा दिनांक – 23 नोव्हेंबर

अर्जाची छाननी – 24 नोव्हेंबर

अर्ज मागे घेण्याची मुदत – 26 नोव्हेंबर

मतदान – 10 डिसेंबर (सकाळी 8 ते 4)

मतमोजणी – 14 डिसेंबर

निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा – दि. 16 नोव्हेंबर

Leave A Reply

Your email address will not be published.