राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक ; लॉकडाऊन बाबत निर्णय होण्याची शक्यता

0

मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढत प्रभाव पाहता राज्य मंत्रिमंडळाची आज तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. आज दुपारी 3 वाजता ही बैठक होणार असून सर्व मंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला उपस्थित असतील. लॉकडाऊन बाबत या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

राज्यात कोरोनाचा प्रकोप झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने राज्यातील अनेक शहरांमध्ये संचारबंदी घालण्यात आली आहे. 2 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या संवादात येत्या दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं.

आज मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्यात परिस्थिती आणखी बिघडली तर संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Maharashtra Cabinet meeting scheduled to be held at 3pm today through video conferencing.

— ANI (@ANI) April 4, 2021

Leave A Reply

Your email address will not be published.