उक्त संस्थेच्या आदेशानील अटीनुसार त्यांचेमार्फत एमडी भरण्यात न आल्यान व मनुष्यबळाची माहिती मुदतीत सादर करण्यात न आल्याने करारनामा करण्यात आलेला नाही. तदनंतर दि.२१/०९/२०२० रोजी म्हणजेच जवळपास ४५ दिवसांनंतर त्यांचेमार्फत मनुष्यबळाची यादी सादर करण्यात आलेली होती. सदर यादीमध्ये नमूद कर्मचाऱ्यापकी स्टाफनर्स कर्मचा-यांचे नोदणी प्रमाणपत्र सादर करण्यात आलेले नाहीत. तसेच अनामत रक्कम अद्यापही भरलली नाही. सदर दोनीही कोविर नजर मेंटर येथे रारणांसाठी आवश्यक पर्व सुविधांची तयारी पूर्ण झाल्यावही उत्त.पत्रामध्ये नमूद करण्यात आलेले होते .
त्यानुसार दोन्हीही कोविड केअर सेंटरची तपासणी करुन अहवाल सादर करनेकामी जेष्ट वैद्यकियअधिकारी , भोसरी रुग्णालय यांना कळविण्यात होते. त्यामार्फत दि.२५/०९/२०२० गादर अहवाल करण्यात आलेला आहे. सादर अहवालानुसार आदेश रामस्मुर्ती मंगल कार्यालय हिरा लॉन्म या दोन्हीही कोव्हिड सेंटरचे ठिकाणी पेशंट किट , साफसफाई साहित्य , डॉक्टराचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट , पीपीई किट , मात्र उपलब्ध नसल्याच काळविलेले होते. लगेच नियमाप्रमाण दोन बेडमध्य आवश्यक अंतर नसल्याच बाथरुम व टॉयलेट सुविधा मानका प्रमाण नसल्याचे, आपातकालीन ऑक्सीजन सिलेंडर इतर आवश्यक माहित्य उपलब्ध नसल्याचे अग्निशामक सुरक्षा साधने, जनरेटर नसल्याचे नमुद करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर औषधाचा साठा व यादी, लिनन जैववैदिकिय घनकचरा नोंदणी, कर्मचारी हजेरीपत्रका देखील उपलब्ध नसल्याचे अहवालामध्ये करण्यात आलेले आहे.
संस्थमार्फत वरील बाबींची पूर्तता झालेली नसल्याने त्यांच्या सोबत करारनामा केलेला नव्हता. असे असताना देखील उक्त संस्थामार्फत त्यांचे सीईओ डॉ.अमोल हळकुंदे यांनी दी.१/११/२०२० रोजी रामस्मुती मंगल कार्यालयाचे कामकाजापोटी दि .१/०८/२०२० ते दि.२०/१०/२०२० या कालावधीकरिना र २,६३,३०,४०० रु. व हिरा लॉन्स येथील कामकाजापोटी दि.१/०८/२०२० ते दि .२०/१०/२०२० या कालावधीकरिता र.रु .२,६३,३०,४०० / – इतक्या रकमेचे एकत्रित रक्कम ५,२६,६०,८०० इतक्या रकमेची बिले सादर केलेले आहे.
वास्तविकता उक्त संस्थेमार्फत कोव्हिड केअर सेंटर कार्यान्वित करणेकामी आवश्यक असलेल्या सुविधानी पूर्तता करण्यात आलेली नाही. तसेच आवश्यक मनुष्यबळाची माहिती विलंबाने सादर केल्याने व नियमानुसार अनामत रक्कम भरण्यात आलेली नसल्याने त्यांचेसमवेन करारनामा करण्यात आलेला नाही. तसेच अद्यापी दोन्हीही सेंटर येथे कधीच एकही रुग्ण दाखल झालेला नसतांना डॉ.हळकुंद यांचेमार्फत सादर करण्यात आलेली बिले ही चुकीची व मनपाची फसवणूक करण्याचे हेतुने सादर केली असल्याचे निदर्शनास येत आहे. सदर बाब ही अत्यंत गभीर स्वरुपाची आहे. सबब वरील बाबींचे अवलोकन करता भोसरी येथील रामस्मृती मंगल कार्यालय व हिरा लॉन्स या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेल्या कोव्हीड केअर सेंटर येथील कामकाजापोटी सादर करण्यात आलेले बिल हे निव्वळ मनपाची फसवणूक असून त्याकरिता डॉ.हळकुंदे हे दोषी आहेत. डॉ.हळकुंदे या विरुद्ध नियमाधीन कार्यवाही करण्यात यावी असे मत आहे शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली.