एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना ‘एनआयए’कडून अटक

0

मुंबई : एनआयएने एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा मारून प्रदीप शर्मा यांना अटक केली आहे. त्यामुळे संपुर्ण राज्य पोलिस दलात आणि राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

एनआयएने आज प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरावर छापा टाकता स्थानिक पोलिसांची मदत न घेता थेट सीआरपीएफची मदत घेतली आहे. त्यातून एनआयए ने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखविला आहे. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अ‍ॅटिलिया या निवासस्थानाबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे याला मदत केल्याचा आरोप प्रदीप शर्मा यांच्यावर करण्यात येत होता. त्यांच्याकडे यापूर्वी चौकशीही करण्यात आली होती. त्यानंतर आता एनआयएने ही कारवाई केली आहे.

अंधेरी येथील प्रदीप शर्मा यांच्या घराबाहेर सीआरपीएफच्या 8 ते 10 कंपन्यांच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखविल्यामुळे यावरुन आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. अंधेरीतील जे व्ही नगर भागात प्रदीप शर्मा यांचे एका पॉश सोसायटीत तिसर्‍या मजल्यावर घर आहे़ त्याच इमारतीच्या तळमजल्यावर त्यांचे कार्यालय आहे़

#UPDATE | NIA arrests Shiv Sena leader and former ‘encounter specialist’ of Mumbai Police, Pradeep Sharma.

A raid was conducted at his residence in Mumbai today.

— ANI (@ANI) June 17, 2021

Leave A Reply

Your email address will not be published.